Thursday, August 13, 2020

*अश्याच एका निवांत क्षणी*

अश्याच एका निवांत क्षणी आठवण तिची व्हावी
कोरड्या मातीस हळूवार भिजवणाऱ्या
रिमझिम पावसासारखी
वाऱ्याच्या मंद झुळुकेनी दर्वळलेल्या
प्राजक्ताच्या सुगंधासारखी
शिशिरातल्या गारव्यात पानाफुलांवर 
चमकणाऱ्या दवबिंदूसारखी
अश्याच एका निवांत क्षणी आठवण तिची व्हावी
अन् हुरहूर लावणारी कातरवेळ अलवार तिच्या
आठवणीच्या ओलाव्यात सरावी



10 comments:

  1. कदाचीत प्रेमात आठवणी या समांतर असाव्या...??

    छान कविता....👌👌😇

    ReplyDelete
  2. Replies
    1. Thanks brother.. Learnt a lot from your writing..

      Delete
  3. एकांत अनुभवण्यासाठी एकदा प्रेमात हरावे लागते.
    सुंदर रचना...👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks brother.. In fact your poems are my inspiration 👍

      Delete