Monday, February 14, 2022

पाऊस

पाऊस.. खुशाल थेंब सरींचा.. 

पानांवरून ओघळणारा..

फुलांवर बागडणारा..

मातीला बिलगणारा..

खिडकीवर रमणारा..

क्षणाभरच्या त्या अस्तित्वाला

अनेक अर्थ असणारा





Sunday, September 5, 2021

* देवचाफा *


देखण्या हळदी रंगात

देवचाफा बहरला

गंधाळलेला पहाटवारा 

दिला सोबतीला




Sunday, April 11, 2021

* स्वच्छंद *


चित्रात का होईना पाहिले स्त्री चे रूप स्वच्छंद

तुटले ते पाश आणि चढला नवीन साज




* चारोळी - नजर *


झुकवून नजर जराशी

हसलीस तू हलकीशी

अन् सजून गेले अलगद स्वप्न

पापण्यांच्या उराशी